image
आमच्याबद्दल माहिती

कृष्णाई फाउंडेशनबद्दल माहिती

कृष्णाई फाउंडेशन ही सेवाभावी संस्था असून या संस्थेची स्थापना ही वर्ग 2011 ला कृषी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी एकत्र येऊन केली. आज रोजी कृष्णाई फाउंडेशन गेल्या दहा वर्षापासून सामाजिक कार्याचा वसा घेऊन अविरत कार्य करीत आहे. कृष्णाई फाउंडेशन ही संस्था नर्मदाय आयुक्त सह नीती आयोग नोंदणीकृत असून 12A-80G व CSR प्रमाणित आहे.
कृष्णाई फाउंडेशन द्वारे खालील 5 महत्वपूर्ण सेवाभावी प्रकल्प राबवत आहे.
1) कृषी क्षेत्र- अन्नदाता प्रकल्प
2) आरोग्य क्षेत्र- आरोग्य सेवा प्रकल्प
3) शिक्षण क्षेत्र- संडे स्कूल प्रकल्प
4) सृष्टी संवर्धन क्षेत्र- वसुंधरा प्रकल्प
5) समाज सक्षमीकरण- शक्ती प्रकल्प
हे प्रकल्प शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या अकोला बुलढाणा व वाशिम यासारख्या जिल्ह्यात सुरू असून या प्रकल्पाच्या माध्यमातून समाज उत्थानाचे काम जवळपास सातशे समाजसेवकांच्या सहकार्याने, राज्य शासन- केंद्र शासनाच्या, विविध कंपन्यांच्या व दातांच्या आर्थिक पाठबळा ने करीत आहे या सोबतच कृष्णाई फाउंडेशन ग्रामीण युवकांना व शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचे व कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देत आहे व भविष्यात सुद्धा या धर्तीवर प्रकल्प राबवण्याचे मानस आहे.

आमचे सेवा प्रकल्पे

आम्ही सध्या पाच महत्वाच्या सेवा प्रकल्पांचे मार्गदर्शन करत आहोत.

कृषी क्षेत्र
अन्नदाता प्रकल्प

या प्रकल्पाच्या अंतर्गत अकोला वाशिम बुलढाणा विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी जिल्ह्यामध्ये राबवित आहे या प्रकल्प अंतर्गत फाउंडेशनचे कृषी पदवीधर कर्मचारी व स्वयमसेवक शेतकऱ्यांमध्ये जाऊन कृषीच्या नवतंत्रज्ञान प्रसार प्रशिक्षण, अभ्यास दोऱ्याचे आयोजन करून शेती उपयोगी साहित्य पुरवून “अन्नदाता सुखी भव” या म्हणी ला सत्यते उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे आज रोजी जवळपास 50 गावांमध्ये चार हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.

Click for more

आरोग्य क्षेत्र
आरोग्य सेवा प्रकल्प

या प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यावर भटकंती करणाऱ्या मतिमंद व मानसिक रुग्णांना प्राथमिक गरजांची पूर्तता करणे व तसेच प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणे हे काम केले जाते तसेच झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या व सतत भटकंती करणाऱ्या लोकांना एक वेळेस अन्न मिळत नाही अशा गरजू लोकांना अन्नदान करणे यासोबतच दत्तक गावामध्ये सर्व सामान्य लोकांना आरोग्य बाबत सुविधा आरोग्य तपासणी शिबिर या माध्यमातून कृष्णाई फाउंडेशन चे डॉक्टर व स्वयंसेवक दर आठवड्याला ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देतात. या प्रकल्पाच्या अंतर्गत 14 गावात काम सुरू आहे.

Click for more

शिक्षण क्षेत्र
संडे स्कूल प्रकल्प

या प्रकल्पाच्या अंतर्गत झोपडपट्टी परिसरातील व गरीब विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी लावणे शक्य होत नसल्याने स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीमध्ये हे विद्यार्थी मागे पडत असून यांना पुढे आणण्याकरिता फाउंडेशनचे शिक्षक व स्वयंसेवक रविवारला विशेष शिकवणी घेऊन शाळेत सुरू असलेल्या अभ्यासक्रमांची उजळणी करीत आहेत थोडक्यात या उपक्रमाला एक शाळेचे स्वरूप झोपडपट्टीमध्ये जाऊन देण्यात येते त्या उपक्रमाला संडे स्कूल संबोधल्या जाते. या उपक्रमांतर्गत शेकडो गरजू विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा काम करीत आहे.

Click for more

पर्यावरण संरक्षण क्षेत्र
वसुंधरा प्रकल्प

या प्रकल्प अंतर्गत सृष्टी संवर्धनाचे कृष्णाई फाउंडेशन काम करीत असून या मध्ये जल संवर्धनाचे काम वृक्षारोपणाचे काम स्वच्छता अभियान इत्यादीचे काम विविध ग्रामपंचायतीमध्ये राबवित आहोत यामुळे सृष्टीचा समतोल राखण्या त छोटासा वाटा फाउंडेशन श्रमदानातून करीत आहे.

Click for more

सामाजिक सशक्तिकरण
शक्ति प्रकल्प

या प्रकल्पाचा महिलांना ग्रामीण युवकांना कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीची निशुल्क प्रशिक्षण देण्यात येते व त्यासोबतच रोजगार उभा करण्याकरिता प्रकल्प सुद्धा फाउंडेशन बनवून देत. आतापर्यंत या शक्ती प्रकल्प अंतर्गत जवळपास 500 महिलांना व ग्रामीण युवकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

Click for more

मदत करा

आम्ही वैयक्तिक, समूह, संस्था, फर्म, आणि कॉर्पोरेट्स पासून दाने स्वीकार करतो. आपण कृष्णाई फाउंडेशनच्या बँक खात्यात इच्छित रक्कम देऊ शकता.